शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अवधी वाढवा

By admin | Updated: July 11, 2014 23:18 IST

गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बाळासाहेब काळे - जेजुरी
महसूल विभाग आणि जिल्हा पुरवठा शाखा यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एक दिवसाचे जीर्ण झालेल्या शिधापत्रिका नवीन करणो, एकत्र कुटुंबातील शिधापत्रिका विभक्त करणो, हरविलेल्या शिधापत्रिका नव्याने बनवून देणो आदी शिधापत्रिकासंदर्भात असणा:या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तेथील तहसील कार्यालयाच्या सोयीने दिवस ठरवून एक दिवसाचे प्रत्येक मंडल विभागात शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात प्रत्येक विभागाचे मंडल अधिकारी त्या-त्या मंडलातील गावा-गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
अर्ज स्वीकारल्यानंतर एक महिन्यात नवीन शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहेत. मात्र, हे एक दिवसाचे शिबिर न ठेवता ते किमान आठवडाभर ठेवणो आवश्यक असल्याचे शिधापत्रिकाधारक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सांगत आहेत. शासनाने तशी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
आज पुरंदर तालुक्यात असेच 
एक दिवसाचे शिबिर आयोजित 
केले होते. 
तालुक्यातील सासवड, जेजुरी, शिवरी, परिंचे, वाल्हे, नायगाव, नारायणपूर आदी ठिकाणी सकाळी 
9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेर्पयत ही शिबिरे पार पडली. मात्र, 
शिबिराचे नेमके नियोजन नसल्याने शिधापत्रिका धारकांना मनस्ताप 
सहन करावा लागला. 
शिधापत्रिका नवीन मिळवणो, विभक्त करणो, जुन्या व जीर्ण झालेल्या बदलून देणो, हरवलेल्या नव्याने तयार करून देणो आदी अडचणी सोडवण्यासाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती हवीत, हेच अनेकांना माहीत नसल्याने त्यांना दिवसभर हेलपाटे मारावे लागले, तर अनेकांना रिकामेच परतावे लागले. 
विभक्त शिधापत्रिका करण्यासाठी वेगळे राहत असल्याचा पुरावा कोणीही एका दिवसात उपलब्ध करू शकत नाही. हरवलेल्या शिधापत्रिकसाठी पोलीस ठाण्याचा दाखला एकाच दिवसात मिळणो शक्यच नाही. नावे कमी करणो, जीर्ण व फाटलेली शिधापत्रिका बदलून देणो, एवढेच शक्य होत होते.
 
शिधापत्रिकाधारकांचा उडाला गोंधळ
4मात्र, इतर अडचणींसाठी लागणारे पुरावे उपलब्ध न होऊ शकल्याने शिधापत्रिकाधारकांचा गोंधळ उडत होता. त्यातच कोणताही गाजावाजा अथवा लोकांर्पयत माहिती न पोहोचवता झालेले हे शिबिर त्या अर्थाने कुचकामीच ठरले आहे. नागरिकांच्या कोणत्याच अडचणीची सोडवणूक या शिबिरातून झालेली नाही. प्रत्येक मंडल विभागातील या शिबिरांचे यशस्वी आयोजन झालेले नाही. यामुळेच एक दिवसाचे हे शिबिर न ठेवता सप्ताहाचे स्वरूप देणो गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
 
तलाठी गैरहजर; शिबिराचा उपयोगच नाही
4तालुक्यातील तहसील कार्यालयाकडून प्रत्येक गावा-गावात गाव कामगार तलाठय़ामार्फत या संदर्भातील अधिकृत माहिती पुरवणो आवश्यक आहे. शिधावाटप दुकानदार आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन गरजेचे आहे. शिधापत्रिकेचे नेमके काय करायचेय, आणि त्यासाठी लागणारे दाखले, पुरावे कोणते हवेत याची माहिती शिधापत्रिकाधारकांर्पयत पोहोचवणो अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या शिबिरात नेमकी माहिती नसल्याने शिधापत्रिकाधारकांत मोठा गोंधळ उडाला होता. त्यातच अनेक गावांतील गाव कामगार तलाठी हजर नसल्याने अनेक गावातील शिधापत्रिकाधारकांना या शिबिराचा काहीच उपयोग झालेला नाही. 
 
योग्य नियोजन करून योजना करा
4शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी जशी एक दिवस हे शिबिर आयोजित केल्याची अधिसूचना काढली, तशीच सूचना एक सप्ताहासाठी काढावी. त्याचे शासकीय यंत्रणोमार्फत योग्य नियोजन करावे, यामुळे कोणीही शिधापत्रिकाधारक या योजनेपासून वंचित राहणार नाही.  मुळातच 1999 मध्ये तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. 15 वर्षानंतर आज त्या जीर्ण व फाटल्या आहेत. तसेच, यापूर्वी तीन वेळा अशाच प्रकारे केवळ अर्ज भरून घेतले होते. मात्र, शिधापत्रिका देण्यात आलेल्या नव्हत्या. आता अत्यंत लोकप्रिय व लोकहिताची ही योजना योग्य नियोजन करून पुरेसा वेळ देऊन पूर्ण करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.