शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या मानधनात होणार वाढ

By admin | Updated: July 1, 2015 03:48 IST

महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनात आता लवकरच वाढ होणार आहे. नगरसेवकांच्या मानधानात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचा

पुणे : महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनात आता लवकरच वाढ होणार आहे. नगरसेवकांच्या मानधानात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचा अभिप्राय महापालिका प्रशासनाकडून मागविण्यात आला होता. त्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय देण्यात आला आहे. मात्र, हे मानधन किती वाढणार, हे अद्याप गुलदस्तातच आहे. नगरसेवकांना दर महिना साडेसात हजार रुपये इतके मानधन व प्रत्येक सभेला शंभर रुपये याप्रमाणे दर महिन्याला जास्तीत जास्त चार सभांसाठीचा भत्ता मिळतो. त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी काही वर्षांपासून होत आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. गेल्या पंचवार्षिक पालिकेत भाजपाचे नगरसेवक विकास मठकरी यांनी नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावर जोरदार टीका झाल्याने तो मागे घ्यावा लागला होता. मात्र, राज्य शासनानेच आता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी शासनाने महापालिकांकडून अभिप्राय मागविला आहे. पुणे महापालिका प्रशासनानेही शासनाला नुकताच पालिकेचा अभिप्राय पाठविला असून, त्यात शासन निर्णय घेईल तो पालिकेला मंजूर असेल, असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे मानवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)