नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 10:34 IST2021-07-07T10:33:59+5:302021-07-07T10:34:05+5:30

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे मंगळवारी रात्री घडली ही घटना, त्यानंतर आरोपी फरार

Incidents that tarnish the relationship! Grandfather killed his grandson in a land dispute | नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

नात्याला काळिमा फासणारी घटना! जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

ठळक मुद्देआजोबांना घरातील वस्तुंनी मारहाण केल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

पुणे: शिरूर तालुक्यातील केंदूर येथे नात्याला काळिमा काळिमा फासणारी घटना घडली असून शेताच्या वादातून नातवानेच आजोबांचा खून केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९ रा.केंदूर ताथवडेवस्ती ता. शिरूर )असे व्यक्तीचे नाव असून आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी (वय ३६, रा. केंदुर ता. शिरूर) हा नातू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शेताच्या वाद झाला. त्यानंतर भरतने आजोबांच्या घरी जाऊन शेताला काट्या लावता काय... ! मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आता तुला खल्लास करणार आहे. असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून आजोबांच्या डोक्यात, चेहर्‍यावर, मांडीवर दगडाने व लाकडी चौरंग, टेबल, फॅनने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यामध्ये आजोबा मृत्युमुखी पडले. दरम्यान निर्मला शंकर ताथवडे (वय ५५ रा. ताथवडेवस्ती केंदुर) या भांडणे सोडवण्यास गेल्या असता त्यांना देखील भरतने मारहाण केली आहे. घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Incidents that tarnish the relationship! Grandfather killed his grandson in a land dispute