पुण्यातल्या बिबवेवाडीतील घटना! ट्रॅक्टरच्या धडकेने १० वर्षीय मुलाने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 18:50 IST2021-06-01T18:50:41+5:302021-06-01T18:50:47+5:30
मुलगा रस्त्याच्या कडेला सायकल घेऊन उभा होता, त्याचवेळी दिली धडक

पुण्यातल्या बिबवेवाडीतील घटना! ट्रॅक्टरच्या धडकेने १० वर्षीय मुलाने गमावला जीव
पुणे: रस्त्याच्या कडेला सायकल घेऊन उभा असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका १० वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. प्रदीप जयानंद गायकवाड (वय १०, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी ट्रॅक्टरचालक चंद्रकांत लक्ष्मण कोळी (वय २७, रा. येवलेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप गायकवाडचा मामा सिद्धराम मेलकेरी (वय २२, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रदीप सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शेळकेवस्ती परिसरात सायकलवरुन जात होता. काही अंतरावर त्याचा मामा सिद्धराम थांबला होता. प्रदीप सायकल घेऊन रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्याचवेळी बांधकामाचा राडारोडा घेऊन आलेल्या ट्रॅक्टरने प्रदीपला धडक दिली. त्यात प्रदीपचा मृत्यु झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरचालक कोळी याला चोप दिला असून कोळी याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.