कोयाळी येथे भानोबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:14 IST2021-09-10T04:14:21+5:302021-09-10T04:14:21+5:30

शाळेच्या नूतन इमारतीचे एन्प्रो इंडस्ट्रीजचे मुख्य व्यवस्थापक श्रीकृष्ण करकरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार अशोक मोहोळ, प्रेसिडेंट ...

Inauguration of new building of Bhanoba Vidyalaya at Koyali | कोयाळी येथे भानोबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोयाळी येथे भानोबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

शाळेच्या नूतन इमारतीचे एन्प्रो इंडस्ट्रीजचे मुख्य व्यवस्थापक श्रीकृष्ण करकरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार अशोक मोहोळ, प्रेसिडेंट जगमोहन सिंग भुर्जी, कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज शहा व स्थानिक मान्यवरांच्या हस्ते हस्तांतरण व उद्घाटन केले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव बाळासाहेब गांजवे, विश्वस्त संग्राम मोहोळ, दिलीपराव जाधव, डॉ. प्रवीण घाणेगावकर, विजय काळभोर, सुहास गोरे, प्रदीप कुंभार, कल्याणी कुलकर्णी, मुकुंद मुळे, अंकाजी पाटील, देवेंद्र देशपांडे, किसन नेहेरे, हरिश्चंद्र बालघरे, वैशाली कोळेकर, रुपाली आल्हाट, देविदास गायकवाड, रामभाऊ दिघे, भाऊसाहेब बरकडे, राजाराम आल्हाट, भरत आल्हाट, गणेश आल्हाट, सुनील आल्हाट, राहूल आल्हाट, सतीश भाडळे, समाधान भाडळे उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक बाळासाहेब तनपुरे यांनी शाळेतील विविध उपक्रमांचा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा दिला. सूत्रसंचलन संजय भामरे यांनी तर उत्तमराव खेसे यांनी आभार मानले.

फोटो

कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथील श्रीभानोबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Inauguration of new building of Bhanoba Vidyalaya at Koyali