शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाला ‘अतिक्रमण’चे टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 04:57 IST

महापालिकेच्या मुख्य इमारतीत अतिक्रमण विभागासाठी देण्यात आलेली जागा सोडण्यास नकार देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या खोल्यांना सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क टाळेच ठोकले.

पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीत अतिक्रमण विभागासाठी देण्यात आलेली जागा सोडण्यास नकार देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या खोल्यांना सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क टाळेच ठोकले. त्यामुळे बसण्याच्या जागांवरून महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी महापालिका आयुक्तांनीही मध्यस्थी करण्यास नकार दिल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क हे टाळे तोडून कामकाज केले. जवळपास चार ते पाच तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे अनेकांचे मनोरंजन झाले तर, पाणीपुरवठा विभागात कामासाठी आलेल्या नागरिकांना हेलपाटा घ्यावा लागला.महापालिकेच्या काही विभागप्रमुखांची कार्यालये शहरात इतरत्र आहेत. त्यामुळे या विभागप्रमुखांना अनेकदा बैठका तसेच इतर कामांसाठी महापालिकेत यावे लागते. यात अतिक्रमण विभाग, वाहतूक नियोजन विभाग यांसारख्या काही प्रमुख विभागांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकारी तसेच अधिकाऱ्यांच्या सहीसाठी नागरिकांचे होणारे हेलपाटे कमी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बसण्याची सोय मुख्य इमारतीमध्ये करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.> महापालिकेतील असलेल्या खोल्यांची संख्या प्रत्येक विभागासाठी निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, पहिल्या मजल्यावरील तीन खोल्या अतिक्रमण विभागास देण्यात आल्या होत्या. या खोल्यांमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या मीटर बिल तसेच वेतनाची बिले आणि स्वारगेट, चतु:शृृंगी तसेच लष्कर जलकेंद्राचे काम चालते. या ठिकाणी जवळपास ४0 ते ५0 कर्मचारी आहेत.> या ठिकाणचे कर्मचारी सकाळी दहा वाजता कामावर आले असता, त्यांना या खोल्यांना कुलूप लावलेले व दारावर अतिक्रमण विभागाची नोटीस दिसून आली. त्यामुळे चक्रावलेल्या या कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांसह थेट महापालिका आयुक्तांचे कार्यलय गाठत हा प्रकार सांगितला. या वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी ही कुलपे काढण्याचे तोंडी आदेश दिले.