Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:45 IST2023-11-06T09:44:52+5:302023-11-06T09:45:05+5:30

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे....

In the elevator, the pervert showed a pornographic video to the girl! Incident in Kothrud | Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

पुणे : क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. ही घटना कोथरूड येथील एका कोचिंग क्लासच्या बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी घडली. याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी कोथरूड येथील एका कोचिंग क्लासमध्ये ट्यूशनसाठी जाते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. बिल्डिंगच्या पार्किंगमधून ती लिफ्टने क्लासमध्ये जात होती. त्यावेळी लिफ्टमध्ये एक अनोळखी व्यक्ती होता. लिफ्ट वर जात असताना आरोपीने संबंधित मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: In the elevator, the pervert showed a pornographic video to the girl! Incident in Kothrud