शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
4
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
5
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
6
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
7
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
8
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
9
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
10
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
11
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
12
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
13
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
14
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
15
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
17
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
18
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
19
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
20
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

By अजित घस्ते | Updated: June 1, 2025 20:34 IST

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत

अजित घस्ते

पुणे: सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोरील १२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वाहन चालकाने मद्यपान केले होते. त्याला कार चालवता येत नाही असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तर अपघातावेळी कारमध्ये असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय २७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवून देत सोडण्यात आले आहे. पोलिसांनी शनिवारी (ता.१) मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. शनिवारी (ता.३१) सायंकाळी भरधाव कारने चहा प्यायला थांबलेल्या १२ जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहोत. तर इतरांना उपचार घरी पाठविण्यात आले आहे.  
 
मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची आज परिक्षा होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतडे करत आहेत.
सोडली

टॅग्स :jailतुरुंग