राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात कामशेतच्या तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 10:10 IST2023-09-05T10:03:46+5:302023-09-05T10:10:48+5:30

या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू...

In a terrible accident in Rajasthan, three people from Vadgaon Maval died on the spot, two were seriously injured | राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात कामशेतच्या तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात कामशेतच्या तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

वडगाव मावळ (पुणे) : राजस्थान येथे कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कामशेत येथील व्यापारी घेवरचंद रूपावत यांच्या पत्नी आणि नात व चालक अशा तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अबूरोड राजस्थान येथे रविवारी झाला.

लीलाबाई घेवरचंद रूपावत (वय ६२) प्राची रूपावत (वय १४) व चालक हिरालाल प्रजापत अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर घेवरचंद रूपावत व त्यांची सून आशादेवी रूपावत हे दोघे जखमी झाले आहेत. कामशेत येथील व्यापारी घेवरचंद रूपावत हे कुटूंबासह आपल्या कारमध्ये राजस्थानला निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वर हनुमान टेकडीजवळ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर गेली.

कार समोरून येणाऱ्या ट्रकच्या खाली घुसली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कामशेत शहरात  शोकाकळा पसरली आहे.

Web Title: In a terrible accident in Rajasthan, three people from Vadgaon Maval died on the spot, two were seriously injured