शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:04 IST

सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवरच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अजित पवारानी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे भर सभेत मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावर त्यांच्याजवळ जात अजित पवारांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी मिश्किलपणे भाष्य करत म्हटलं की, ‘माझं टक्कल पडलं तरी लोकं मला शिकवतात. असं म्हणताच भरसभेत हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. 

राजगुरुनगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे अजित पवार यांच्याजवळ व्यासपीठावर गेले आणि त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार मिश्किलपणे भाष्य करत म्हणाले की, “होय होय बाबा होय. आता हा मला शिकवायला चाललाय, आता असं बोला, आता तसं बोला. माझं पार टक्कल पडलंय ना. तरी लोक मला शिकवतायेत. आता काय करू या बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला.

म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणार 

राजगुरूनगरमध्ये विकास साधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी याठिकाणी योग्य पद्धतीनं कसा वापरायचा, त्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना व सीएसआर फंडच्या माध्यमातून देखील निधी विकास कामांकरिता याठिकाणी आणता येईल. याशिवाय भूमिहीनांना म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणं, अशी कामं आम्ही सुरू केलेली असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

आगामी निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं, हा निर्णय तुमच्या हातात

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत असताना या राजगुरुनगरमध्ये सुद्धा विकास झाला पाहिजे.  महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानं मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मतदार राजा आहे. आगामी निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं, हा निर्णय तुमच्या हातात असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's witty remark about being taught despite baldness amuses crowd.

Web Summary : During a Rajgurunagar rally, Ajit Pawar humorously responded to advice from a party worker, joking about being taught even with his bald head, sparking laughter. He also pledged development and housing for the landless.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारKhedखेडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagaradhyakshaनगराध्यक्षMahayutiमहायुती