शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:39 IST

भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला विरोध वाढत असून, आमरण उपोषणाच्या हत्यारानंतर आता पुण्यातील ४० अंशाच्या तापमानात, तसेच रखरखीत उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश काढण्यात आला. यातून शेतकऱ्यांनी विरोध आणखी तीव्र केला असून, विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतांवरूनच होईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येणार आहे. याविरोधात सात गावांतील शेतकऱ्यांनी, तसेच नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह भर उन्हात सोमवारी (दि. २८) अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा आक्रोश मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे सभेत रूपांतर झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, विमानतळ होऊ देणार नाहीच, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

या वेळी कोळसे म्हणाले, पुरंदर विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल. शेतकरी विमानतळाला जमीन देणार नाहीत, हा आमचा निर्धार आहे. हा निर्धार पक्का असून, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या विमानतळामुळे हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार आहेत. जिल्ह्यात अनेक जागा उपलब्ध असून, तिथे विमानतळ करावे. या गावात जाऊन येथील परिस्थिती पाहिली आहे. एक - एक रुपया गोळा करून संसार उभा केला आहे. लांबून पाणी आणले आहे. हे सगळे बरबाद करायला निघाले आहेत. यातून अनेक संसार बुडणार आहेत. मात्र, याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. विमानतळ अडविणारच. राज्य सरकारने विरोधकांचे अस्तित्व नाकारणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे.ज्यांच्यासाठी विमानतळ बांधण्यात येत आहे, त्यांनी काय त्याग केला, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ज्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांचा या विमानतळासाठी बळी का दिला जात आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले.

राज्य सरकार बळजबरीने विमानतळ लादत आहे. घटनेच्या ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार सातही गावातील ग्रामपंचायंतीचा विमानतळास विरोध असल्याचा ठराव मंजूर करण्यात आले आहे. मात्र, सरकार याचा विचार करत नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. या विमानतळामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. पुढच्या पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेतकरी मानसिक दबावाखाली आहेत.

ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. यामुळे येथील संस्कृती, भौगोलिक स्थिती आणि पर्यावरण नष्ट होणार आहे. सरकार केवळ पैसा देण्याचा विचार करत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या जीविताचा विचार करत नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याऐवजी त्यांना पीडा देण्याचे काम सरकार करत आहे. त्याला वाचा फोडावी, म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हा तालुका नष्ट करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत व्हावे. विमानतळाचे भूत लाथाडायचे आहे. केवळ मोबदला देऊन चालणार नाही. आमचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. - मंजुषा गायकवाड, सरपंच, कुंभारवळण

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनPurandarपुरंदरAirportविमानतळcollectorजिल्हाधिकारीairplaneविमानMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार