शिक्षकांची भाषा समृद्ध असल्यास विद्यार्थ्यांनाही भाषेची गोडी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:27+5:302021-02-05T05:16:27+5:30

पुणे : शिक्षक हा भाषाप्रेमी असला पाहिजे. शिक्षकांची भाषा अधिक समृद्ध असेल तर पुढील पिढीलाही भाषेची अधिक गोडी लागेल. ...

If the language of the teacher is rich, the students will also have a taste for the language | शिक्षकांची भाषा समृद्ध असल्यास विद्यार्थ्यांनाही भाषेची गोडी लागेल

शिक्षकांची भाषा समृद्ध असल्यास विद्यार्थ्यांनाही भाषेची गोडी लागेल

पुणे : शिक्षक हा भाषाप्रेमी असला पाहिजे. शिक्षकांची भाषा अधिक समृद्ध असेल तर पुढील पिढीलाही भाषेची अधिक गोडी लागेल. त्यासाठी एकेकाळी शिक्षकांमध्ये प्रतिष्ठेची असलेली परिषदेची ‘साहित्य विशारद’ ही पदवी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी परीक्षा घेण्यात येतात. २०१९-२०२० यावर्षी घेतलेल्या ‘साहित्य विशारद’ या परीक्षेमध्ये श्रीकांत चौगुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रा. जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यावेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परीक्षा विभागाचे कार्यवाह प्रा. माधव राजगुरू उपस्थित होते.

प्रा. माधव राजगुरू म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षांना ८२ वर्षांची परंपरा लाभली आहे. ‘साहित्य विशारद’ ही एकेकाळी प्रतिष्ठा लाभलेली परीक्षा खंडित झाली होती. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून ती पुन्हा सुरू केली. या परीक्षेला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे. ‘साहित्य विशारद’ या परीक्षेला भविष्यकाळात उत्तम प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील.’

Web Title: If the language of the teacher is rich, the students will also have a taste for the language