"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले त्यांना पंतप्रधान करा", पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 18:15 IST2021-07-18T18:15:04+5:302021-07-18T18:15:10+5:30

चव्हाण यांना राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

"If Chief Minister Uddhav Thackeray becomes popular, make him the Prime Minister", Prithviraj Chavan's reaction | "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले त्यांना पंतप्रधान करा", पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले त्यांना पंतप्रधान करा", पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

ठळक मुद्देकाँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं

पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुखमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितलं जात आहे. यावरून उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करावे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे चव्हाण यांना काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

चव्हाण म्हणाले, “मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून ३२ ते ३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी.”

कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहे. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं? देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, दिशाभूल करणारी विधानं करतात. देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी सांगत नाही. मी आकडे मांडले आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय निर्णय घेतले?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Web Title: "If Chief Minister Uddhav Thackeray becomes popular, make him the Prime Minister", Prithviraj Chavan's reaction