Pune: महिलेचे अंघोळ करताना फोटो काढणाऱ्या IB च्या सुरक्षारक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:01 IST2021-11-23T15:47:02+5:302021-11-23T16:01:24+5:30
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

Pune: महिलेचे अंघोळ करताना फोटो काढणाऱ्या IB च्या सुरक्षारक्षकाला अटक
पुणे: आंघोळ करणाऱ्या महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय २६, रा. आय बी गेस्ट हाऊस) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पुणे स्टेशनजवळ आयबीचे हे शासकीय निवासस्थान आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या आयबी गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत सोमवारी दुपारी आंघोळ करीत होत्या. यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अशोक चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला. खिडकीचे बाहेर उभा राहून त्याने आंघोळ करणाऱ्या या महिलेचे आपल्या मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथे असणाऱ्या लोकांनी चव्हाण याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.