Pune: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:32 IST2026-02-03T18:32:05+5:302026-02-03T18:32:23+5:30

तरुणीचे ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्याला आरोपीने दोघांच्या प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठवली त्यामुळे नियोजित पतीने लग्न मोडले

'I won't let you get married, I'll kill your family', boyfriend threatens, young woman's marriage also breaks up | Pune: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले

Pune: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले

पुणे : ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, यासह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपीशी चार वर्ष प्रेमसंबध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवू नको, माझे लग्न ठरले आहे, असे आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपी तरुणाने ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, असे म्हणत तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. तसेच आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचा ज्याच्याशी लग्न ठरले होते. त्याला प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठविली. नियोजित पतीने लग्न मोडले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

Web Title : प्रेमी ने परिवार को जान से मारने की धमकी दी, शादी टूटी।

Web Summary : पुणे: एक प्रेमी ने महिला के परिवार को जान से मारने की धमकी दी, जिससे उसकी शादी टूट गई। आरोपी को येरवड़ा में गिरफ्तार किया गया है, क्योंकि उसने मंगेतर को निजी तस्वीरें भेजी थीं।

Web Title : Jealous lover threatens to kill family, breaks off girl's wedding.

Web Summary : Pune: A jilted lover threatened to kill a woman's family, leading to the cancellation of her wedding. The accused, in Yerwada, was arrested after sending intimate photos to her fiancé.