शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

'मी खानदानी पैसेवाला, गंमत म्हणून नोकरी करतो' गुटखा खात मुख्यालय सहाय्यकाची बेताल बडबड, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:54 IST

मला साडेसतरा एकर ऊस, केळी आहे, काहीही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतोय

इंदापूर : तीन वेळा अर्ज करुन देखील मूळ प्रकरणाची नक्कल न मिळाल्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्याचा राग धरुन बेताल बोलणाऱ्या मुख्यालय सहाय्यकाने, पोलीसांना पाचारण केल्यानंतर पोबारा केल्याची घटना सोमवारी ( दि.२०) दुपारी येथील भूमि अभिलेख खात्याच्या कार्यालयात घडली.  विवेकानंद कुलकर्णी ( रा. पळसदेव, ता.इंदापूर) असे या मुख्यालय सहाय्यकाचे नाव आहे. त्यांनी संबंधित तक्रारदारास,'मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझा साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. काही ही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबाला पाठवले काय किंवा कोठे पाठवले तरी मी घाबरणार नाही' अश्या शब्दात सुनावले होते. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात खुलमखुल्ला गुटखा खात त्यांनी ही बेताल बडबड केली होती. या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर वायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा पूरती मलीन झाल्याचे चित्र आहे. 

 सविस्तर वृत्त असे की, संतोष महादेव रकटे (रा. शेटफळगढे, ता.इंदापूर) यांनी शेटफळगडे येथील गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१ या मूळ प्रकरणाची संपूर्ण केस नक्कल मिळण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयाकडे तब्बल तीन वेळा अर्ज केला होता. त्यांना ती नक्कल मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका उपअधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांना तात्काळ नकला देण्याचा आदेश दिला. त्याचा राग आल्याने पुढचे रामायण घडले. कुलकर्णी यांनी नशापाणी केले आहे किंवा कसे खातरजमा करण्यासाठी तक्रारदाराने पोलिसांना पाचारण केल्यानंतर कुलकर्णी यांनी तेथून पोबारा केला. दरम्यान, या संदर्भात भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुशील पवार यांना विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. कारवाईची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Arrogant Official: 'Rich, Job for Fun,' Gutka-Chewing Rant Viral

Web Summary : Indapur land records office saw chaos after an official, irked by a complaint, boasted about his wealth, chewed gutka, and fled after police were called. Suspension proposed.
टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPoliceपोलिसGovernmentसरकारSocialसामाजिकViral Videoव्हायरल व्हिडिओcommissionerआयुक्त