अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 21:03 IST2025-07-31T21:03:03+5:302025-07-31T21:03:40+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत, बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात

I accept the decision that Ajit Pawar will make I will honestly fulfill the responsibility given to me - Dattatreya Bharane | अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

बारामती : माझ्याकडे कृषी खाते येणार याबाबतची माहिती मला माध्यमांकडूनच समजत आहे. याबाबत अधिकृत कुठेही घोषणा करण्यात आली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमचे नेते आहेत. यांच्याकडून मला कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील. माझ्यावर जी जबाबदारी टाकतील. तो माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री भरणे यांनी दिली.
 
बारामती येथे आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली. काँग्रेस (अजित पवार) गटाचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  कोकाटे यांच्याकडील कृषी खाते क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे जाणार असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री भरणे यांनी  प्रतिक्रिया दिली. भरणे म्हणाले, माझ्याकडे कृषी खाते येणार, याबद्दल मला कसलीही माहिती नाही. मी आज पुरंदर इंदापूर दौऱ्यावर होतो. मात्र अद्याप मला कुठलीही अधिकृत माहिती नाही. 
 
बारामतीकर न सांगता खूप काही देतात, असं वक्तव्य भरणे यांनी केलं होतं. या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले की, माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कारखान्यावर न मागता संधी दिली. 1996 साली बँकेच्या संचालक पदावर, चेअरमन पदावर संधी दिली. झेडपी अध्यक्ष, आमदार, मंत्री पदावर न सांगता संधी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत. बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात. असेही भरणे यावेळी म्हणाले. कृषी खात्याची जबाबदारी तुमच्यावर दिल्यानंतर ती जबाबदारी तुम्ही कशी पेलाल? या प्रश्नावर  भरणे म्हणाले की, अद्याप कृषी खात्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा नाही. मात्र ज्यावेळी अधिकृत घोषणा होईल. त्यावेळी याबाबत स्पष्ट भूमिका मांडता येईल,असे भरणे म्हणाले.

Web Title: I accept the decision that Ajit Pawar will make I will honestly fulfill the responsibility given to me - Dattatreya Bharane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.