शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास आणि ५ हजार रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:26 IST

ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ मध्ये घडली होती.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. पी. अ्ग्रवाल यांनी मयेपर्यंत जन्मठेप (आजन्म कारावास) आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ मध्ये घडली होती. राजू याने आपली पत्नी सविता हिच्यावर कुऱ्हाडीने वार करुन तिचा  खून केला होता.याप्रकरणी विनाेद दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती. दुसाणे दामप्पत्याला २ मुली व एक मुलगा आहे. या घटनेपूर्वी एक महिना आधी सविता हिला एक फोन आला होता. हे राजू याने पाहिले होते. तेव्हापासून तो सविताच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. एकदा त्याने सविता हिच्या साडीचा पदरही पेटवून दिला होता. तिच्या मुलीने ही आग विझविली होती. चारित्र्याच्या संशयावरुन घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राजू याने सवितावर कु-हाडीने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो रक्ताने भरलेल्या कपड्यांसह वारजे पोलीस ठाण्यात हजर झाला.तेथील पोलिसांना मी पत्नीचा खुन केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन घरी गेले. तेव्हा सविता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर व डोक्यावर वार करण्यात आले होते.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी ९ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायालयाने राजू दुसाणे याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.

........

हा खटला परिस्थिती जन्य पुराव्यावर आधारीत होता. तसेच आरोपींचे कपडे आणि कुऱ्हाड जप्त करण्यात आली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हासिद्ध करता आला.

ॲड. सुनील मोरे, सरकारी वकील

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसjailतुरुंगMurderखूनWomenमहिला