शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 19:14 IST

लॉकडाऊन मध्ये अनेकांनी हे विवाह पुढे ढकलले आहेत,तर काहींना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देबारामती शहरात लॉकडाऊनमध्ये मोजक्याच लोकांमध्ये उरकलेला विवाह कौतुकाचा विषय

बारामती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये अनेकांचे विवाह अडकले आहेत. विवाह मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जातो. मात्र, लॉकडाऊन मध्ये अनेकांनी हे विवाह पुढे ढकलले आहेत,तरकाहींना लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा आहे. बारामती शहरात लॉकडाऊनमध्ये मोजक्याच लोकांमध्ये उरकलेला विवाह कौतुकाचा विषय ठरला आहे.या विवाहासाठीनवरदेव एकटाच दुचाकीवरुन बारामतीत एकटाच पोहचला,तर विवाहानंतर नवदांपत्यदुचाकीवरच फलटणकडे नवरदेवाच्या घरी रवाना झाले.

शहरातील महात्मा फुले नगर येथील साहेबराव माणिक जगताप यांनी त्यांचीमुलगी कांचन हिचे फलटण येथील सुरज दिलीप काकडे यांच्याशी ठरलेहोते.पूर्व नियोजित ठरलेल्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी(दि २८)  संध्याकाळी ६.३० यावेळेत फलटण येथील नवरदेव सुरज दुचाकीवर पोहचले.त्यासाठी नवरदेव काकडे यांनी पोलिसांची परवानगी देखील घेतली होती. तसेच बारामतीत हे लग्न मोजक्या दहा लोकांनमध्ये लावण्यासाठी वधुच्या कुटुंबियांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची परवानगी देखील घेतली होती.  

शासनाच्या फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यासह मोजक्याच लोकांच्या उपस्थिती विवाह उरकणार असल्याबाबत अर्ज करण्यात आला होता. या पूर्वनियोजित लग्न सोहळ्याला नवरदेव सुरज यांचे आई व वडील लॉकडाऊन मध्ये मुंबईला अडकले आहेत.तसेच फलटण पोलिसानी केवळ नवरदेवाला परवानगी दिली होती. आमराई मधील महात्मा फुले नगर येथील महात्मा फुले व्यायाम शाळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. अवघ्या चार ते पाच जणांमध्ये पार पडलेला विवाह शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी सोशल डिस्टन्स चे सर्वनियम पाळुन विवाह उरकण्यात आला.त्यानंतर नवदांपत्य दुचाकीवर नवरेदवाच्याघरी निघुन गेले.यावेळी नगरसेविका अनिता जगताप, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,सहायक पोलीस निरीक्षक पद्मरात गंपले,सामाजिक कार्यकर्ते दिनेश जगताप आदी उपस्थित होते.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी लॉकडाऊनमध्ये हा विवाह पारपाडण्यासाठी वधुच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले.—————————————

टॅग्स :Baramatiबारामतीmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर