मुलीला घेऊन पती २ महिन्यापासून बेपत्ता; कारवाईला पोलिसांची टाळाटाळ; हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:06 IST2023-08-16T13:05:25+5:302023-08-16T13:06:33+5:30

हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा पत्नीचा आरोप होता

Husband missing with daughter for 2 months Police reluctance to act Hotel Vaishali controversy flared up again | मुलीला घेऊन पती २ महिन्यापासून बेपत्ता; कारवाईला पोलिसांची टाळाटाळ; हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला

मुलीला घेऊन पती २ महिन्यापासून बेपत्ता; कारवाईला पोलिसांची टाळाटाळ; हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला

किरण शिंदे 

पुणे : हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता पाटील यांनी आता आपल्या पत्नी विरोधात आरोप केले आहे. चार वर्षाच्या मुलीला घेऊन पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता आहे. या मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी अशी मागणी निकिता शेट्टी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटा का करत आहेत असा सवालही त्यांनी विचारला. दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरा पाहिला नाही. तिची आणि माझी भेट घडून आणावी अशी आर्थ विनवणी ही निकिता शेट्टी यांनी पुणेपोलिसांकडे केली आहे.

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

Web Title: Husband missing with daughter for 2 months Police reluctance to act Hotel Vaishali controversy flared up again