पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:44 AM2024-04-21T11:44:55+5:302024-04-21T11:45:22+5:30

पती समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली

Husband gay Harassment by husband and mother in law Nanand as soon as the married woman comes to know after the marriage | पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

पुणे : पती समलैंगिक असल्याची बाब लपवून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीसह, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तक्रारदार महिलेचा जानेवारी २०२२ मध्ये एकाशी विवाह झाला होता. महिलेचे सासर कारवार येथे आहे. सासरी गेल्यानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या निदर्शनास आले. विवाहानंतर महिलेला घरखर्च करण्यास भाग पडले. किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. तुझ्यामुळे माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद झाले आहे. तुझ्यापेक्षा चांगली सून आम्हाला मिळाली असती, असे टोमणे सासू आणि नणंदेने मारले.

टोमणे आणि मारहाणीमुळे महिला माहेरी नुकतीच निघून आली. पती समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मगदूम पुढील तपास करत आहेत.

Web Title: Husband gay Harassment by husband and mother in law Nanand as soon as the married woman comes to know after the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.