शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 8:48 PM

जीवाला धोका असल्याची व्यक्त केली होती भीती

पुणे : अ‍ॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

आजच मोक्का कारवाई झालेल्या दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला पोलिसांनीअटक केली होती. 

काळे यांचे पती रामाणी हे कॅनेडियन नागरिक असून सध्या ते मोठ्या मुलाकडे कॅनडा येथे वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती काळे ही लहान मुलासह पुण्याला राहत आहे.

यापूर्वी दीप्ती काळे हिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची २०१९ मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान तिच्या जीवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक या प्रसंगी पुण्यात नाही. सध्याच्या कोविडच्या काळात चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करत असल्याचे रामाणी यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी दिली.

दरम्यान, अ‍ॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्युची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल.

टॅग्स :PuneपुणेS. Jaishankarएस. जयशंकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक