पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:38 IST2025-11-06T13:37:42+5:302025-11-06T13:38:36+5:30
कीटकनाशक औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले होते, सखोल तपास केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला

पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू
दौंड : नानवीज ( ता.दौड ) येथे पत्नी आणि मुलाने मारहाण केल्यामुळे आबासाहेब पाटोळे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी उषा आबासाहेब पाटोळे (पत्नी), संस्कार आबासाहेब पाटोळे (मुलगा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
२मे २०२५ रोजी सायंकाळी आबासाहेब पाटोळे शेतातून काम करून दुपारी दारु पिऊन घरी आले होते. त्यानंतर पत्नी उषा आणि मुलगा संस्कार यांच्याबरोबर त्यांचे भांडण झाले. दरम्यान सायंकाळी त्यांनी कीटकनाशक औषध पिल्याने मयत झाल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान वैद्यकीय शवविच्छेदन अहवालानुसार सदर व्यक्ती यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. परिणामी पत्नी उषा आणि मुलगा संस्कार यांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या सतर्कते मुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.