सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा पतीचा आरोप; पन्नाशी ओलांडलेल्या दामप्त्याचा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:48 IST2026-01-21T17:47:38+5:302026-01-21T17:48:41+5:30

दाम्पत्याचा २५ वर्षांचा मुलगा परदेशात शिकत असून, सज्ञान आहे. तर मुलगी दहावी उत्तीर्ण असून, सतरा वर्षांची आहे

Husband accuses wife of constant physical and mental torture; Couple over 50 divorce | सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा पतीचा आरोप; पन्नाशी ओलांडलेल्या दामप्त्याचा घटस्फोट

सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा पतीचा आरोप; पन्नाशी ओलांडलेल्या दामप्त्याचा घटस्फोट

पुणे: दोघांनी पन्नाशी ओलांडलेली... पत्नीकडून सततच्या शारीरिक व मानसिक त्रास आणि तिचे विवाहबाह्य संबंध या गोष्टींना कंटाळून पतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी मंजूर केला. मात्र, मुलगा हा सज्ञान आहे, तर सतरा वर्षीय मुलीला वडिलांपेक्षा आईची गरज अधिक असल्याचे नमूद करत मुलांच्या ताब्याची मागणी फेटाळून लावली. राकेश (वय ५३) आणि स्मिता (वय ५१) (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह २९ डिसेंबर १९९६ रोजी झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. 

लग्नाच्या काही वर्षांनंतर तिच्याकडून शारीरिक तसेच मानसिक छळ सुरू झाला. यादरम्यान, तिने स्वत:ला इजा करण्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे विवाहबाह्य संबंध सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढत घटस्फोटासह मुलांच्या ताब्याची मागणी केली. न्यायालयाने क्रुरतेच्या आधारावर घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. मात्र, परदेशात शिकत असलेला मुलगा हा २५ वर्षांचा असून, सज्ञान आहे. त्यामुळे त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नाही. तर मुलगी दहावी उत्तीर्ण असून, सतरा वर्षांची आहे. तरुण मुलीला वडिलांपेक्षा आईची गरज जास्त असते. त्यामुळे मुलगी आईसोबत राहण्यामध्येच तिचे भवितव्य साधले जाणार आहे. त्यामुळे राकेश यास दोन्ही मुलांचा ताबा मागण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करत कायमस्वरूपी ताबा मिळण्याची मागणी फेटाळून लावली.

मुलांच्या ताब्याबाबत ‘बालकाचे कल्याण’ हे तत्त्व केंद्रस्थानी ठेवत निर्णय देण्यात आला. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. पत्नीपासून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासातून पतीची सुटका झाली. याचा जास्त आनंद आहे. - ॲड. राणी कांबळे-सोनावणे, पतीचा वकील.

Web Title : पति को मिली तलाक, दुर्व्यवहार का आरोप; बच्चे की कस्टडी नहीं

Web Summary : पत्नी के क्रूर व्यवहार और बेवफाई के कारण पुणे के एक पचास वर्षीय जोड़े का तलाक हो गया। पति को बालिग बेटे और नाबालिग बेटी की कस्टडी नहीं मिली। अदालत ने बेटी की भलाई को प्राथमिकता दी, यह निर्धारित करते हुए कि उसे अपनी माँ की ज़रूरत है।

Web Title : Husband Granted Divorce Citing Abuse; Child Custody Denied

Web Summary : Pune couple in their fifties divorced due to wife's cruelty and infidelity. The husband's custody of their adult son and minor daughter was denied. Court prioritized the daughter's well-being, determining she needed her mother.