शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एकवीसशे वर्षांपूर्वी मानव वस्ती

By admin | Updated: March 23, 2015 00:55 IST

सिंहगड घेरा परिसरातील विस्तीर्ण अशा दऱ्याखोऱ्यात साधारण एकवीसशे वर्षांपूर्वीही मानववस्ती असल्याचे पुरावे आढळून आले आहेत.

खडकवासला : सिंहगड घेरा परिसरातील विस्तीर्ण अशा दऱ्याखोऱ्यात साधारण एकवीसशे वर्षांपूर्वीही मानववस्ती असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. सातवाहन काळातील अर्धवट खोदलेल्या एका लेणीचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला आहे.कॉलेजच्या इतिहास अभ्यासकांकडून किल्ले सिंहगड व या परिसरातील संदर्भ, येथील जुनी इतिहासकालीन ठिकाणे, गड परिसराची रचना, त्याचे अवशेष व त्या संदर्भात अभ्यास केला जात आहे. इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते हे डेक्कन विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिंहगड व परिसराचा पुरातन अभ्यास’ या विषयावरस संशोधनात्मक प्रबंध करत आहेत.कोंढाणा किल्ल्याचा प्राचीन अभ्यास करत असताना या ठिकाणी सिंहगडावरील कोंढाणा मंदिराच्या बांधकामाची रचना ही यादवकालीन असल्याचे दिसून येत आहे. मात्र मते यांच्या एका पाहणीत १३०० वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण २१०० वर्षांपूर्वीही या परिसरात मानव वस्ती होती असे आढळून आले आहे. किल्ले सिंहगडाचे घेरा परिसरात अतिशय दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या दुर्गम दऱ्यात तत्कालीन सांबर मेटाच्या (सांबरेवाडी) वरच्या बाजूला व पूर्वीच्या खाडेमेटाच्या उंचच उंच तटामध्ये (कड्यात) जुन्या काळातील दस्तांमध्ये या ठिकाणाची चौराहा म्हणून नोंद आढळून येते.सध्या घेरा सिंहगड परिसराबाबत सन १३०० पर्यंतच्या कालखंडातील लेख संदर्भ आढळतात. एका ग्रंथात (लेखात) त्या काळी म्हणजे सन १३२८ मध्ये महंम्मद तुघलक व नागनाथ कोळी या दोघांत पूर्वीच्या कुंदियानावर म्हणजेच कोंढाणा (सिंहगड) वर युद्ध झाले होते. (वार्ताहर)४डेक्कन कॉलेजचे प्राचीन शिलालेख व नाणी अभ्यासक डॉ. अभिजित दांडेकर यांनी या संदर्भात सांगितले, की सिंहगडाच्या उत्तरेला छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधिस्थळाच्या खालच्या बाजूला असलेल्या कड्याच्या उत्तर दिशेला असलेल्या एका कातळ डोंगराच्या रांगेतील या कोरलेल्या लेणीत ‘स’ हे अर्धवट नाव कोरलेले आहे. अशा पद्धतीने लेख कोरण्याचा काळ हा इ.स.पूर्व म्हणजे पहिल्या शतकातील सातवाहन काळातील आहे.४लेणी अभ्यास डॉ. श्रीकांत गणवीर यांनी सांगीतले की, घेरा परिसरात खोदलेल्या या लेण्यात व येथील खडकात ठिसुळपणा आढळुन येत असुन कदाचीत त्या काळी हे काम अर्धवट राहण्याचे कारण म्हणजे राजाश्रय मिळाला नसावा किंवा निधीची कमरता जाणवली असावी. ४डॉ. श्रीकांत प्रधान सांगीतले की सिंहगड घे-यातील लेणी कोरण्याची पद्धत पहाता हे लेणे म्हणजे राहायला सुरक्षित ठिकाण येथे बसण्यासाठी बाक, दोन शयनगृह (खोल्या), पिण्याचे पाण्यासाठी टाके अशा पद्धतीचे आहे. सातवाह काळातील लेण्यांशी जुळणारे हे लेण्याचे खोदकाम असुन छन्नी सारख्या साधनाचा वापर यात केला गेल्याने हे मानवनिर्मीत खोदकाम आहे याचाच अर्थ येथे मानववस्ती असली पाहिजे असाही होतो.