Video : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार...! चालक–कंडक्टरला मारहाण; प्रवाशांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:58 IST2025-12-05T13:56:48+5:302025-12-05T13:58:12+5:30
- पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही धक्कादायक घटना खेड–मंचर मार्गावर घडली आहे.

Video : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार...! चालक–कंडक्टरला मारहाण; प्रवाशांमध्ये दहशत
पुणे :पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही धक्कादायक घटना खेड–मंचर मार्गावर घडली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, खेड घाटात एका थार गाडीने एसटी बसला आडवे थांबवून दोन तरुण थेट बसमध्ये शिरले. त्यांनी चालक आणि कंडक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी उपस्थित होते. अचानक सुरू झालेल्या हल्ल्यामुळे बसमध्ये ओरडाआरड झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या दरम्यान, चालकाने बस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी चालत्या बसमध्येच चालकाला मारहाण केली, त्यामुळे बसवरील नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होऊन मोठा अपघात टळला असे सांगितले जाते. मारहाण थांबवण्याचा प्रयत्न एका ज्येष्ठ प्रवाशाने केला, पण त्यांना देखील ढकलून दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाला असून यावरून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप असून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. या गुंडगिरीमुळे परिसरात आणि प्रवाशांमध्ये दहशत पसरली असून, कठोर कारवाईची मागणी वाढत चालली आहे.