Video: वाघोलीत स्कुल बस झाडावर आदळून भीषण अपघात; काही विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:39 IST2023-12-05T13:38:11+5:302023-12-05T13:39:15+5:30

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस झाडावर आदळल्याचा अंदाज

Horrific accident in Wagholi school bus hits a tree Some students injured | Video: वाघोलीत स्कुल बस झाडावर आदळून भीषण अपघात; काही विद्यार्थी जखमी

Video: वाघोलीत स्कुल बस झाडावर आदळून भीषण अपघात; काही विद्यार्थी जखमी

वाघोली : वाघोली येथे स्कुल बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा एक नामांकित शाळेचे विध्यार्थी स्कुलबसमध्ये  होते. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बसचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आले नाही . मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून बस झाडावर आदळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कुलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झाला आहे. या बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस झाडावर आदळल्याचा अंदाज आहे. दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या बस वरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात अली असून, पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. चालकाने वेगात ही बस चालवल्याने निदर्शनात येत आहे पालकांनी या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त केला असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Horrific accident in Wagholi school bus hits a tree Some students injured