शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, माय-लेकीचा मृत्यू, पती व २ वर्षांचा मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:10 IST

दाम्पत्य आणि २ मुले दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

बारामती : बारामती-पारवडी मार्गावर गुरुवारी (दि ४) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर कोकणे हे पत्नी रूपाली कोकणे, पाच वर्षांची मुलगी सानवी आणि दोन वर्षांचा मुलगा कृष्णा यांच्यासह दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे जात होते. दरम्यान, बारामती-कटफळ-पारवडी मार्गावरील परीट वस्ती परिसरात खडकीकडून बारामतीच्या दिशेने चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सानवी मयूर कोकणे (वय ५) व तिची आई रूपाली मयूर कोकणे (२५) यांचा मृत्यू झाला. तर मयूर कोकणे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा कृष्णा गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, रूपाली व सानवी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळी सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले असून फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Accident: Wrong-way Car Kills Mother, Daughter; Husband, Son Injured

Web Summary : A tragic accident near Baramati claimed the lives of a mother and daughter after a car traveling in the wrong direction collided with their motorcycle. The husband and their two-year-old son sustained serious injuries. The car driver fled the scene; police are investigating.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीDeathमृत्यूbikeबाईकhusband and wifeपती- जोडीदारWomenमहिलाAccidentअपघात