Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:44 IST2024-11-26T13:41:26+5:302024-11-26T13:44:13+5:30

Pune Crime News: तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गापासून शंभर मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह फेकण्यात आला होता.

horrible Woman's body stuffed in gunny bags found in pune | Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?

Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?

Pune Crime News: मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. महिलेची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकण्यात आला. तळेगाव परिसरात मुंबई-पुणे महामार्गालगत झुडपात मृतदेह असलेलं पोते फेकण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह एका ३५-४० वर्षीय महिलेचा आहे. महिलेची आधी हत्या करण्यात आली. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने ओळखत पटवणे पोलिसांना आव्हानात्मक झाले आहे. 

तळेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गापासून शंभर मीटर दूर हा मृतदेह फेकण्यात आला होता. मृतदेहाची अवस्था खूपच वाईट झालेली होती. महिलेने रेड लेगिज आणि कुर्ता घातलेला होता. 

महिलेचा मृतदेह कसा सापडला?

सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी परिसरात दुर्गंधी यायला लागली. त्यामुळे आयआरबी पथकाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी परिसरात जाऊन पाहणी केली. जिथून दुर्गंधी येत होती, तिथे जाऊन बघितले असता पोलिसांना पोते दिसले. 

पोलिसांनी पोत्यात बघितले असता एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे. दरम्यान, मयत महिला कोण आहे, तिची हत्या कोणी केली आणि कधी करण्यात आली, याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

Web Title: horrible Woman's body stuffed in gunny bags found in pune