विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: June 7, 2025 19:38 IST2025-06-07T19:37:45+5:302025-06-07T19:38:31+5:30

दोन मित्रांसह बोपदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता. तेव्हा तेथे कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले.

Hookah pot found in student's bag and police demanded Rs 30,000; Police constable booked for extortion | विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल

विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : कोंढवा पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर, कारवाई करण्याच्या धमकीने या पोलिस कर्मचाऱ्याने २८ हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. ही घटना बोपदेव घाटात ५ जून रोजी घडली. पोलिस शिपाई विक्रम लक्ष्मण वडतीले आणि त्याचा साथीदार केदार जाधव या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अदनान रजा (१९, रा. चेन्नई) याने तक्रार दिली आहे.

फिर्यादी हा त्याच्या दोन मित्रांसह बोपदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता. तेव्हा तेथे कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले. या दोघांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांची सॅक तपासली. यातील एका सॅकमध्ये हुक्क्याचे सामान सापडले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत ३० हजारांची मागणी वडतीले याने केली. मात्र तडजोडीअंती फिर्यादीच्या मित्राने केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार वर्ग केले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच वडतीले याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नवनाथ जाधव करत आहेत.

 

Web Title: Hookah pot found in student's bag and police demanded Rs 30,000; Police constable booked for extortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.