फिक्की फ्लोच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST2021-03-05T04:10:16+5:302021-03-05T04:10:16+5:30

पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मानचिन्ह ...

Honoring Women Corona Warriors on behalf of Ficci Flow | फिक्की फ्लोच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

फिक्की फ्लोच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मानचिन्ह प्रदान करीत पुणे जिल्हा, पुणे शहर, सामाजिक संस्था, गावपातळी, रुग्णालये आणि पोलीस खाते या आघाड्यांवर काम करणाऱ्या १२ महिला कोरोना योद्ध्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले.

फ्लो पुणेच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस, वरिष्ठ उपाध्यक्षा उषा पूनावाला, फ्लो पुणे चॅप्टरच्या अनेक महिला सदस्या आदी या वेळी उपस्थित होत्या.

पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या डॉ. सोनाली पात्रीकर व डॉ. ज्योती फाळके, पुणे शहर उपायुक्त डॉ. वनश्री लब्शेटवार, पुणे महानगरपालिकेच्या सह आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे, स्पेर्युल या समाजसेवी संस्थेच्या डॉ. गीता बोरा, चित्रपट दिग्दर्शक दीप्ती घाटगे, पिंपरी सांडस गावाच्या उपसरपंच सारिका शिंदे, नोबल रुग्णालयाच्या डॉ. रीमा तांदळे, रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग अधिकारी तृप्ती नंदा, सहकारनगर पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व्हेलन्स विभागातील पोलीस नाईक मीनाक्षी महाडिक आदींना पुरस्कार देत गौरविण्यात आले.

डॉ. अनिता सणस यांनी प्रास्ताविक केले तर सोनिया राव यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Honoring Women Corona Warriors on behalf of Ficci Flow