शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

'होम क्वारन्टाइन' रुग्ण घटले, गंभीर रुग्ण १० हजारांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चाललेला असताना सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. गृह विलगीकरणामध्ये असणारे रुग्ण ...

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चाललेला असताना सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. गृह विलगीकरणामध्ये असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे झाले आहे. परंतु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या मात्र, दहा हजारांच्या घरात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. मार्च आणि एप्रिल हे महिने पुणेकरांसाठी अत्यंत घातक ठरले. या काळात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुसज्जता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बेडची संख्या १४ हजारांच्या पार नेण्यात पालिका प्रशासनाला यश आले. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने प्रशासन देखील हतबल झाले होते. सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेल्यामुळे या चिंतेमुळे अधिकच भर पडली होती.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनापाठोपाठ पालिकेनेही १५ एप्रिलपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या उपाययोजनांचा परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्याही कमी होत चालली आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा खाली आला असला तरी गृह विलगीकरणामधील रुग्णांचा आकडा सर्वाधिक कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परंतु व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्ण, पालिकेचे रुग्णालय आणि केअर सेंटरमधील रुग्णालय या सर्वांची संख्या दहा हजारांच्या घरात असल्याने अजूनही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही.

मागील महिन्यापर्यंत सक्रिय रुग्णांपैकी गृह विलगीकरणामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ६५ ते ७० टक्‍क्‍यांच्या दरम्यान होते. मात्र, ते आता ५० टक्क्यांवर आले असून ५० टक्के रुग्ण ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

-------

रुग्ण आकडेवारी

तारीख। सक्रिय रुग्ण। गृह विलगीकरण। सरकारी रुग्णालय। खासगी रुग्णालय। कोविड केअर सेंटर

१५ एप्रिल। ५४,३५१। ४५,४५६। २०५३। ६२२१। ६२१

६ मे। ३९,५८२। २९,४४३। २२५५। ७०४३। ८४१

१२ एप्रिल। २५२२२। १४९१८। ४६२०। ३४९४। २१९०