शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मेट्रोच्या बोगद्याला छिद्र; घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार, मोठा निष्काळजीपणा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:05 IST

थेट बोगद्याच्या वरच बोअरवेल मारल्यामुळे बोगद्याचे नुकसान झाले असून त्या ठिकाणी पाणी गळतीही सुरू झाली आहे

किरण शिंदे 

पुणे: पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भूमिगत मेट्रो बोगद्यावर थेट बोअरवेल मारण्यात आल्याने बोगद्यावर खड्डा पडला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी निष्काळजीपणा समोर आला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रोच्या बोगद्यावर थेट बोअरवेल मारण्यात आल्याने बोगद्यात सुमारे ६ इंचांचा खड्डा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ मार्च रोजी शुक्रवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. 

थेट बोगद्याच्या वरच बोअरवेल मारल्यामुळे बोगद्याचे नुकसान झाले असून त्या ठिकाणी पाणी गळतीही सुरू झाली आहे. या प्रकरणी पुणे मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. तर मूळ घरमालक धनंजय मोटे आणि जगताप नामक ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घराखालून भूमिगत मेट्रो बोगदा जात असल्याची पूर्ण माहिती होती. तरीही आरोपींनी जाणीवपूर्वक आणि निष्काळजीपणे बोअरवेलचे काम केले. या कृत्यामुळे केवळ मेट्रोच्या बोगद्यालाच नव्हे तर नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या घटनेत मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून राबवला जात असल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro tunnel breached by borewell drilling; negligence exposed.

Web Summary : A borewell drilling incident damaged Pune's underground metro tunnel, causing leakage. Police filed a case against the homeowner and contractor for negligence, endangering public safety and causing significant property damage to the metro line.
टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीSocialसामाजिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार