शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अन् बसमध्ये विसरलेली आयुष्याची 'पुंजी' पुन्हा पाहताच 'त्या' कुटुंबाचे चेहरे उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:54 PM

विसरलेल्या बॅगा शोधायच्या तर गाडी सुटून जाण्याची भीती आणि बॅग सोडायची म्हटले तर आयुष्यभरात जमवलेले दागिने, रोख रक्कम गमाविण्याची...दिसली घराची वाट आणि मिळाली आयुष्याची कमाई

पुणे : गेले दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्यावर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी सोय करुन दिली. तेव्हा सर्व सामान घेऊन ते कुटुंब बसने पुणे स्टेशनला पोहचले. रेल्वे स्टेशनला पोहचल्यावर त्या कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. बसमध्ये विसरलेल्या बॅगा शोधायच्या तर गाडी सुटून जाण्याची भीती आणि बॅग सोडायची म्हटले तर आयुष्यभरात जमवलेले दागिने, रोख रक्कम गमाविण्याची भीती अशी अवस्था झाल्याने ते कुटुंब धाय मोकलून रडू लागले. ही बाब तेथे बंदोबस्तावर असलेल्या परकीय नागरिक नोंदणी विभागातील पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशी करुन थेट हडपसरपर्यंत जाऊन त्यांच्या मौल्यवान बॅगा परत घेऊन आले व गाडी सुटण्यापूर्वी त्यांच्या ताब्यात दिल्या. पोलीस बॅगा घेऊन येत असल्याचे पाहून या कुटुंबाचे रडवेल्या चेहर्‍यावर हास्य फुलले आणि डोळ्यातून आनंदाश्रु ओघळू लागले. ते अश्रु पाहून पोलिसांनाही झालेल्या धावपळीचे समाधान लाभले. उत्तर प्रदेशातील बस्तीला जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळी पुणे रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्री ही घटना घडली.

परप्रांतियांना रेल्वेगाडीने त्यांच्या उत्तर प्रदेशातील गावी पाठविण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरुन मंगळवारी रात्री विशेष श्रमिक रेल्वेगाडी सोडण्यात आली. त्यासाठी हडपसर येथून पीएमपी बसने मजूरांना कुटुंबासह रेल्वे स्टेशनला आणण्यात आले होते.समन्वय अधिकारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, निरीक्षकराजकुमार शेरे व त्यांच्या सहकारी त्यावर लक्ष ठेवून होते.  रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक एन्ट्री गेटजवळ एका कुटुंबाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा पोलीस नाईक किरण बरडे, मच्छिद्र धापसे यांनी चौकशी केली. अशोक कुमार, त्यांची पत्नी पूनम देवी व त्यांच्या सोबत २ वर्षांची शिवन्या व २ महिन्यांची अनन्या या कुटुंबाची दागिने व रोकड असलेल्या बॅगा बसमध्ये विसरल्याचे त्यांनी सांगितले. किरण बरडे यांनी बाहेर येऊन चौकशी केल्यावर बस निघून गेली होती. ते दुचाकीवरुन निघाले़वाटेत बस त्यांना आढळली नाही. ते थेट हडपसर डेपोमध्ये गेले. तेव्हा बस सॅनिटाईज करण्यासाठी गेली होती. ते तेथे गेले व बसचालकाला हा प्रकारसांगितला. बसमध्ये त्यांच्या दोन बॅगा आढळून आल्या. त्यांनी मोबाईलवरुन बॅगा मिळाल्याचे सांगितले व पुन्हा हडपसर डेपोतून ते दुचाकीवरुन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचले. रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी त्यांनी अशोककुमार यांच्या किंमती बॅगा त्यांच्या हवाली केल्या. बॅगा मिळताच त्यांना आपला आनंद लपविता आला नाही.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस