'त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार', हजारो समर्थकांसह संजय जगताप यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:42 IST2025-07-16T20:41:37+5:302025-07-16T20:42:03+5:30
पुरंदरमधील प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - रविंद्र चव्हाण

'त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार', हजारो समर्थकांसह संजय जगताप यांचा भाजपात प्रवेश
सासवड: पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रखडलेला गुंजवणी प्रकल्प, सासवड व जेजुरी नगरपरिषदेतील प्रलंबित कामे, निरा नदी जोड प्रकल्प, सहकार चळवळ बळकटीकरण, रेशीम ऊत्पादनातील तुती प्रकल्प व ऊरूळी-फुरसुंगी नगरपालीकेचे रखडलेले काम,जलजीवन मिशन अंतर्गत कामे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि मतदार संघातील प्रलंबित विषयांना मार्गी लावण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय असे सांगणारा संजय जगताप हा लोकप्रतिनिधी मला पहिल्यांदाच भेटला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जगताप यांचे कौतुक करत, त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सुचविलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गती दिली जाईल असे सासवड येथे माजी आमदार संजय जगताप यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी जाहीर सभेत सांगितले.
काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा आज सासवड येथील पालखीतळ मैदानावर भाजपमध्ये हजारो कार्यकर्ते समर्थकांसह पक्षप्रवेश पार पडला. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप व प्रमुख पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, तिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही, इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो या विचाराकडे येण्याचं माझं हेच कारण आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी आज पक्षप्रवेश केला आहे.
या प्रसंगी प्रदेश महामंत्री राजेश पांडे ,रवि अनासपुरे,विक्रम पावसकर ,वासुदेव काळे,गणेश भेगडे,गणेश बिडकर, बाबाराजे जाधवराव,जालींदर कामठे,रंजन तावरे,प्रविण माने,चंद्रशेखर वढणे ,गंगाराम जगदाळे,साकेत जगताप,आनंद जगताप, गिरीश जगताप, अजिंक्य टेकवडे,दिलीप कटके ,संदिप कटके यासह पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन महेश राऊत, जालींदर काळे,सागर जगताप, विकास इंदलकर यांनी केले. आभार सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी मानले.