शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

हडपसरमधील गुन्ह्यात सर्वाधिक घट तर, कोथरुड बेस्ट पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 6:00 AM

गुन्हेगारांची माहिती एकत्र करुन त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने क्रिमीनर इंटेंसिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट (क्रिस्प) ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आला़.

ठळक मुद्देगेल्या ५ महिन्यात प्रमुख गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६६८ गुन्हे कमी पोलीस ठाण्याच्या तपास पथकामुळे गुन्हेगारांचे बाहेर फिरण्याचे प्रमाण कमी

विवेक भुसेपुणे : क्रिस्प योजना राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या पाच महिन्यांच्या कालावधीत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली़. त्यात सर्वाधिक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात जवळपास ५० टक्के गुन्हे कमी झाले़. गुन्हेगारांवर सातत्याने नजर आणि सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावण्यावर देण्यात आलेला भर यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण पुणे शहरात सर्वाधिक आहे़. गुन्हेगारांचे माहिती एकत्र करुन त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने क्रिमीनर इंटेंसिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट (क्रिस्प) ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आला़.  या प्रोजेक्टमुळे शहरातील गुन्हेगारांची अद्ययावत माहिती गोळा झाली़. त्याचबरोबर त्यांच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवली गेली़. त्याचा परिणाम गेल्या ५ महिन्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी या प्रमुख गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६६८ गुन्हे कमी झाले आहेत़. क्रिस्प योजनेत सर्वसाधारणपणे या पाच महिन्यात प्रत्येक पोलीस ठाण्याला सव्वातीनशे ते साडेतीनशे टास्क देण्यात आले होते़.क्रिस्पअंतर्गत हडपसर पोलीस ठाण्याला पाच महिन्यांच्या काळात ३२० गुन्हेगार तपासण्याचे लक्ष्य होते़. त्यापैकी १६७ गुन्हेगार त्यांना सापडले़ हे प्रमाण एकूण लक्ष्याच्या ५२़१८ टक्के होते़.  कोथरुड पोलीस ठाण्याला ३४८ गुन्हेगारांना शोधण्याचा टास्क देण्यात आला होता़. त्यापैकी सर्वाधिक २७७ गुन्हेगारांना चेक करण्यात कोथरुड पोलिसांना यश आले़. हे प्रमाण सर्वाधिक ७९.५९ टक्के इतके आहे़.  क्रिस्प योजनेमुळे शरिरीविरुद्धचे गुन्हे, मालमत्ता चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असे सांगून हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या तपास पथकामुळे गुन्हेगारांचे बाहेर फिरण्याचे प्रमाण कमी झाले़. त्याचबरोबर या भागातील जास्तीतजास्त सोसायट्यांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले़. त्याचा परिणाम गुन्ह्यांमध्ये घट झाली़. कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, अन्य पोलीस ठाण्याच्या मानाने कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची संख्या कमी आहे़ असे असतानाही आमच्या पोलीस ठाण्यातील गुन्हे कमी होण्यात दुसरा क्रमांक लागतो़. ़़़़़़़तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, प्रसाद लोणारे आणि संजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिकांबरोबर संपर्क वाढवून केलेल्या तपासाबरोबर रात्रीचे काँबिंग ऑपरेशन, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स ठेवला़. गेल्या वर्षभरात हडपसर पोलिसांनी ४७४ वाहनचोरीतील गाड्या जप्त केल्या आहेत़. शहरात हे गुन्हेसर्वाधिक उघडकीस आणले़.सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे.................ऑक्टोंबर ते फेबुवारी दरम्यान पाच महिन्यातील दाखल गुन्हेपोलीस ठाणे    २०१७-१८    २०१८-१९    फरकहडपसर         २४५        १२१        १२४कोथरुड        ८९        ४६        ४३दत्तवाडी        ५८        २०        ३८विश्रामबाग        ८८        ५१        ३७खडकी        ५४        १८        ३६़़़़़़़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHadapsarहडपसर