शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सर्वाधिक व्यसनाधिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST

´पुणे : लॉकडाऊनच्या काळात ३१ ते ५० या वयोगटातील लोक व्यसनाधिनतेकडे जास्त झुकताना दिसले. त्याचबरोबर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न् ...

´पुणे : लॉकडाऊनच्या काळात ३१ ते ५० या वयोगटातील लोक व्यसनाधिनतेकडे जास्त झुकताना दिसले. त्याचबरोबर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न् असलेले लोक जास्त व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनचा समाजावर झालेला परिणाम तपासण्यासाठी पोलिसांकडून प्रोजेक्ट आरसा राबविला होता. त्यात हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले. पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस संशाेधन केंद्र प्रमुख अनंत भोईटे यांच्या पुढाकाराने मन:सृष्टी संस्थेने हा प्रकल्प केला. गेल्या २ महिन्यात आरसा हा संशोधन उपक्रम राबविला. या उपक्रमात पुण्यातील ३ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात सिने अभिनेते, डॉक्टर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून रिक्षाचालक, रोजंदारीवरील कामगार, प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग होता.

या संशोधनाच्या निष्कर्षामध्ये असे जाणवले की, ३१ ते ५० आणि ज्येष्ठ नागरिक यांना लॉकडाऊनमधील परिस्थितीशी जुळवून घेणे जास्त कठीण गेले. ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा वाढला. महिलांवर कामाचा ताण वाढला. रोजंदारीवर काम करणारा वर्ग निराश व व्यसनाधीनतेकडे झुकताना दिसला. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल सर्वात जास्त याच वर्गात दिसून आला. त्यामुळे या वर्गासाठी लवकरात लवकर रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. मजुरांच्या खालोखाल विद्यार्थी वर्ग सुद्धा गुन्हेगारी प्रवत्तीकडे कल दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गोष्टीत रमतील, असे उपक्रम शासन व समाजाने सुरु करणे गरजेचे आहे.

नैराश्य वाढल्यामुळे व्यसनाधीनता वाढू शकते आणि व्यसनाधीनता वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढू शकते. या तीनही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे, असे हे संशोधन सांगते.

लाॅकडाऊनच्या काळात अनेक जण नवीन गोष्टी शिकले. त्यामध्ये स्वयंपाक, कला, वाचन, लिखाण, भाषा, वेगवेगळ्या प्रकाराचे ऑनलाईन कोर्सेस अशा अनेक गोष्टी आहेत. स्वत:च्या आरोग्यासाठी व्यायाम, योग, ध्यान या गोष्टी करणे का महत्वाचे आहे हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या लक्षात आले. मित्र, नातेवाईक यांच्याशी नव्याने झालेला संपर्क अनेकांसाठी सुखावणारा ठरला आहे. काही कुटुंबातील नाती खूप चांगली सुद्धा झाली आहेत.

या प्रकल्पात पोलिसांच्या सहकार्याने मन:सृष्टी या शारीरीक व मानसिक आरोग्य विषयक सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या ३० स्वयंसेवकांनी एक महिन्याहून अधिक काळ काम केले. यापुढील काळात लॉकडाऊन सारखा उपाय करावा लागला तर कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. या उत्तम अंदाज समाज व प्रशासकीय यंत्रणांना देणारे हे संशोधन आहे.