शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बच्चेकंपनीला सुट्टीत फिरवा पुण्यातल्या या ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:34 IST

लहानग्यांना घेवून फिरायचं असेल तर आणि वेळ कमी असेल तर आता काळजी नको. पुण्यातच असणारे आणि लहानांसोबत मोठ्यांनाही रमवणारे काही पर्याय खास लोकमतच्या वाचकांसाठी. 

 

पुणे : परीक्षा संपून आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशावेळी घरात बसून कंटाळा आलेल्या बच्चेकंपनीला घेऊन तुम्ही पुण्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देऊ शकता. अगदी शहरातच असणारी ही ठिकाण मुलांना तर खुश करतीलच पण तुमचा वेळ आणि खर्चही वाचवतील.

यशवंराव चव्हाण उद्यान (बागुल उद्यान) 

सहकारनगरमध्ये असणारे बागुल उद्यान मनोरंजनाने पुरेपूर भरलेले आहे. आरशांचा महाल, भुलभुलैय्या,कारंजे, बाग, संग्रहालय अशा मन रामावणारे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे  इथे सुट्टीत मुलांसोबत एक संध्याकाळ मस्त जाऊ शकते. 

पु. ल. देशपांडे उद्यान दुनियादारी चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण इथे पार पडले. त्यातच इथली स्वच्छता, वेगळी मांडणी भुरळ घालणारी आहे. जपानी आणि भारतीय सौंदयाचा नमुना असणारे सिंहगड रस्त्यावरील हे उद्यान आवर्जून बघावे असेच आहे. 

शनिवारवाडा 

शनिवारवाड्याच्या आजूबाजूने आपण अनेकदा वावरत असतो पण आतून हा वाडा कसा आहे हे मुलांना नक्की दाखवा. वाड्याच्या कडेने असलेल्या तटबंदीवरुन चालत शनिवारवाड्याचा इतिहास त्यांना अनुभवण्याची संधी द्या. 

सारसबाग

लहान असताना आपण अनेकदा सारसबागेत गेला असलात तरी मुलांना घेऊन किती वेळा गेला आहात ? तळ्यातल्या गणपती, त्यात फुलणारी कमळं  बघण्यासाठी त्यांना सारसबागेची सफर घडावाच. शिवाय तिथे मिळणारी प्रसिद्ध कैरी भेळही चाखवण्यास विसरू नका.शेजारी असलेले पेशवे उद्यानही त्यांना आवडेल असेच आहे. 

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज 

अतिशय शांत आणि निसर्गरम्य असलेले हे ठिकाण कात्रजला आहे. अनेक प्रजातींचे प्राणी - पक्षी इथे प्रत्यक्षात दिसत असून इथे सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची गर्दी असते. प्राण्यांची आवड असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

कात्रज तलाव 

कात्रज तलावाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तिथे संध्याकाळच्यावेळी 'लाईट शो'ही असतात. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी बच्चेकंपनी तर खुश होईलच पण आनंद मिळेल.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडाTravelप्रवास