शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' ट्रस्टचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:38 IST

अन्नधान्य वितरण, रूग्णालयातील हजारोंची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेला शिधा वाटप

ठळक मुद्देससून रुग्णालयात अडीच हजार जणांची दोन्ही वेळची भोजनाची विनामूल्य सोय गरजू उपेक्षित २५० ते ३०० महिलांसह कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने, कोरोना विषाणूच्या प्रादुभावार्मुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गरजू नागरिक, संस्था, रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे. अन्नधान्य वितरण, रूग्णालयातील हजारोंची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेला शिधा वाटप आदी उपक्रम ट्रस्टच्यावतीने राबविण्यात येत आहेत.याबाबत ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी लोकमत सांगितले की, सन २०१३ पासून जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयात अडीच हजार जणांची दोन्ही वेळची भोजनाची विनामूल्य सोय ट्रस्टतर्फे करण्यात येते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये ५० आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) आणि १०० आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत. तेथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक मिळून अशा सुमारे ४ हजार जणांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजन व्यवस्था आता करण्यात आली आहे़.याचबरोबर अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्सला धान्यरुपी मदत, कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंंबांचा स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरीता ५ हजार साबणांचे वाटप करण्यात आले आहे़. कोरोनामुळे ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता ६ रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. पुणे शहराकरीता या ६ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरात राहणा-या १०० हून अधिक तृतीयपंथीयांना १ महिना पुरेल इतकी धान्याची मदत ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे़. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असलेल्या शहरातील तसेच उपनगरातील झोपडपट्टी परिसरातील गरजू कुटुंबांना तब्बल एक महिना पुरेल इतकी धान्यरुपी मदत देण्यात आली आहे़.याचबरोबर खेड-शिवापूर, पौड, सोमाटणे फाटा, खामगाव, खडकवासला परिसरातील ग्रामीण भागातील वाड्यावस्तयांवरील सुमारे ६०० आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबांनाही एक महिना पुरेल एवढा अन्यधान्य साठा तसेच गोखलेनगर जनवाडी परिसरातील घरकाम व धुणे-भांडी करणाऱ्या  गरजू उपेक्षित २५० ते ३०० महिलांसह कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले असल्याचेही सुर्यवंशी यांनी सांगितले़. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर