मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:41 IST2025-06-24T16:39:19+5:302025-06-24T16:41:33+5:30

- आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत.

Heavy rains in Maval taluka Pawana dam filled to 50 percent for the first time in June | मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले

पवनानगर -  मावळ सह परिसरात गेल्या महिनाभरापासून मावळ तालुक्यासह  पवन मावळ परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या पावसाचा जोर आज दिवसभर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत.
 
पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात ५१.३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होत आहे. आज दिवसभरात २६ मिमी पाऊस झाला आहे. दुपारी ४ च्या आकडेवारी नुसार धरणात ५१.३४ टक्के ईतका पाणीसाठा आहे.

१ जूनपासून धरण क्षेत्रात ६०७.१६ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी आजमितीला धरणात १९ टक्के पाणीसाठा होता. व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरुचं आहे. अशी माहिती पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी दिली.

Web Title: Heavy rains in Maval taluka Pawana dam filled to 50 percent for the first time in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.