शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:26 PM

डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या पश्चिम भागामध्ये काल दुपार पासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर पाटण व आहुपे खोर्‍यामध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान भीमाशंकर कडे जाणार्‍या लोकांनी दुपारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये सलग दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात रोपे गाडली गेल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे वाहतुक बंद झाली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सोमवारी पावसाला सुरुवात झाली. परंतु बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. तर ह्या परिसरामध्ये ह्यावर्षी आतापर्यंत ४६७ मी.मी. पाऊस पडला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये काल दुपार पासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर पाटण व आहुपे खोर्‍यामध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

मंचर- भीमाशंकर ह्या राज्य मार्गावरील पोखरी घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प 

मंचर- भीमाशंकर ह्या राज्य मार्गावरील पोखरी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा रस्ता आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद पडला आहे. बारा ज्योर्तिर्लींगापैकी एक असणार्‍या श्री क्षेञ भीमाशंकरकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे, खोर्‍याप्रमाणेच डिंभे परिसरामध्ये काल राञी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रस्त्यामध्ये मातीच्या ढीगार्‍यासह मोठमोठाले दगड आल्यामुळे  हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला आहे.

सुमारे दोन तीन ठिकाणी मोठ्या दरडी पडल्या असून हा रस्ता पुर्ववत होण्यास वेळ जाणार आहे. तरी भीमाशंकर कडे जाणार्‍या लोकांनी दुपारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाकडून ह्या दरडी काढण्यासाठी  विविध मशनरी पाठवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावBhimashankarभीमाशंकरMancharमंचरRainपाऊसDamधरण