शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

पुणे शहरात तासाभराच्या पावसाने पाणीच पाणी ; पुणेकरांची उडाली तारांबळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 4:10 PM

साधारण अर्धा तास सुरु राहिल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. 

ठळक मुद्देआंध्र प्रदेश, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यतातासाभराच्या पावसाने शहरात पाणीच पाणीवाहतुकीची कोंडी : पुढील चार दिवस पावसाची शक्यता

पुणे : दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर पडलेल्या तासाभराच्या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नसल्याने अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळाले़ वारजे, कोथरुड, खडकवासला भागात जोरदार पाऊस झाला.         सध्या ऑक्टोबर हीट सुरु झाला असून दिवसा शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता.शनिवारी शहरात कमाल तापमान ३३. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्यातच महावितरणच्या विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने शहरातील अनेक भागामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता़ त्यामुळे नागरिकांना घरात कार्यालयात बसणे अशक्य झाले होते. तीव्र उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन आकाश दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वातीनच्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस कोसळू लागला. काही मिनिटातच रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले दिसून येत होते. कर्वे रोड नळस्टॉप चौक आणि म्हात्रे पुलाजवळील रिलायन्स मॉल येथे अर्धा रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला होता. त्यातून वाहन जाणे शक्य नसल्याने पुलावरुन कर्वे रोडकडे येणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती.  

शहरात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फुटपाथाची लांबी वाढविण्यात आली. परंतु हे काम करताना पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही जागा न ठेवल्याने अनेक रस्त्यांवर थोडा पाऊस झाला तरी पाणी साठत आहे.  या वर्षी हे अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ११. ६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी आशय मेजरमेंटच्या नोंदीनुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत खडकवासला ३२ मिमी, वारजे ३६, कोथरुड ४४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. 

पुढील काही दिवस शहरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान