Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट, नागरिकांची उडाली धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:00 IST2026-04-02T14:59:39+5:302026-04-02T15:00:16+5:30

सोमवारपासून पुण्यात दररोज दुपारनंतर पाऊस पडत आहे, जणू काही पावसाळा सुरु झाल्यासारखे वाटू लागले आहे.

Heavy rain in Pune; Gusty winds and gale force winds create panic among citizens | Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट, नागरिकांची उडाली धांदल

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट, नागरिकांची उडाली धांदल

पुणे: शहरासह उपनगरात दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत गारांसह पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आडोशामध्ये थांबणे पसंत केले. शहरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे. 

मंगळवारी आकाश दिवसभर ढगाळ होते. पण, पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाड्यातही वाढ झाली होती. दुपारनंतर तीनच्या सुमारास वारा सुटला आणि उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर आज दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली.  कात्रज-सातारा रस्त्यावर गारा पडत असताना कोथरूड, कर्वेनगर- कर्वे रस्त्यावर ऊन पडले होते. तासाभरानंतर तिथे पावसाला सुरुवात झाली. तर डेक्कन-शिवाजीनगर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा वाढला होता. काल रात्री साडेआठपर्यंत शहरात ०.४ मिलिमीटर तर लोहगावमध्ये ३२.६ मिलिमीटर पाऊस पडला. या हंगामात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा गारांसह पावसाची नोंद झाली.

पावसाची शक्यता

पुणे शहरात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ राहून संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला भारतीय हवामानशास्त्र विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

Web Title : पुणे में बारिश का कहर: गरज, बिजली और मची अफरा-तफरी

Web Summary : पुणे में कई इलाकों में ओलावृष्टि के साथ भारी बारिश हुई, जिससे गर्मी से राहत मिली। मौसम विभाग ने अगले दो दिनों के लिए येलो अलर्ट जारी किया है, जिसमें तेज हवाएं और हल्की बारिश की भविष्यवाणी की गई है।

Web Title : Pune Hit by Rain: Thunder, Lightning, and Commotion Ensue

Web Summary : Pune experienced heavy rain with hailstones in several areas, bringing relief from the heat. The weather department has issued a yellow alert for the next two days, forecasting gusty winds and light rain.