कर्णबधिर मुलांना गवसला श्रवण‘सूर’ !

By Admin | Updated: June 4, 2015 05:32 IST2015-06-04T05:32:54+5:302015-06-04T05:32:54+5:30

न्मजात कर्णबधिरपणा आल्याने सामान्य मुलांबरोबर खेळणे, शाळेत जाण्याला मुकलेली २५ मुले आता सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगू

Hearing of children of deaf children! | कर्णबधिर मुलांना गवसला श्रवण‘सूर’ !

कर्णबधिर मुलांना गवसला श्रवण‘सूर’ !

पुणे : जन्मजात कर्णबधिरपणा आल्याने सामान्य मुलांबरोबर खेळणे, शाळेत जाण्याला मुकलेली २५ मुले आता सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगू शकणार आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या क्वाक्लिअर रोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे आणि त्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या बोलणे-ऐकण्याच्या थेरपीमुळे आता ही मुले ‘नॉर्मल’ शाळेमध्ये आपल्या वयाच्या सर्वसामान्य मुलांबरोबर शिकू शकणार आहेत. दानशूरांच्या मदतीतून या कर्णबधिर मुलांना त्यांची श्रवणशक्ती मिळाली आहे.
गर्भाशयाच्या वाढीत दोष निर्माण झाल्याने काही मुलांना जन्मल्यानंतर ऐकू येत नाही. ऐकू आले नाही तर ती मुले बोलूही शकत नाहीत. त्यामुळे या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या मुलांना सर्वसामान्य मुलांसारखे सर्वसामान्य शाळांमध्ये शिक्षण घेता येत नाही. पुण्यासह महाराष्ट्रात अशा मुलांसाठी जास्त शाळा नाहीत. त्यामुळे ही मुले जास्तीत जास्त आठवी-दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकतात. त्यानंतर इतर कोर्स किंवा काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.
केईएम रुग्णालयातील बिग इअर्स या संस्थेने देणगी जमा करून या मुलांवर मोफत क्वाक्लिअर रोपण आणि त्यानंतर थेरपी देण्यात आली. ही शस्त्रक्रिया आणि थेरपी यशस्वी करून या संस्थेतून ५ ते १४ वयोगटातील २५ मुले नुकतीच बाहेर पडली.
याबाबत बिग इअर्स संस्थेच्या संचालिका व इम्प्लांट सर्जन डॉ. नीलम वैद म्हणाल्या, ‘‘आधुनिक उपचारपद्धतीमुळे कर्णबधिर
मुलांवर उपचार करून त्यांची
गेलेली श्रवणशक्ती मिळवून देणे शक्य झाले आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of children of deaf children!