वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:15 IST2025-10-18T18:14:34+5:302025-10-18T18:15:17+5:30

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती

He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या आंदेकर टोळीतील सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली. आंदेकर टोळीतील सराईताविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. दत्ता बाळू काळे (२४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. प्रतिस्पर्धी टोळीतील सराईत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खुनाचा कट आंदेकर टोळीने रचला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंदेकर टोळीतील सराईतांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.

काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलिस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले आणि अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली

वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (७०) याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकरसह साथीदारांविरोधात ‘मकोका’ करवाई करण्यात आली होती. आंदेकर टोळीविरोधात खंडणी, बेकायदा फलक लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी बंडू आंदेकरसह बांधकाम व्यावसायिकांविरोधात उत्तमनगर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला.

Web Title : आंदेकर गिरोह का सदस्य बदला लेने की साजिश रचते गिरफ्तार; निगरानी रखी।

Web Summary : आंदेकर गिरोह के दत्ता काले को वनराज आंदेकर की हत्या का बदला लेने की साजिश रचने के आरोप में गिरफ्तार किया गया। वह प्रतिद्वंद्वियों के रिश्तेदारों की निगरानी कर रहा था। मकोका के आरोपों के बाद फरार काले को सूचना के बाद लक्ष्मीनारायण सिनेमा के पास पकड़ा गया।

Web Title : Andekar gang member arrested for plotting revenge murder; kept watch.

Web Summary : Dutta Kale, of the Andekar gang, was arrested for plotting revenge for the murder of Vanraj Andekar. He was surveilling rivals' relatives. Kale, previously absconding after MCOCA charges, was caught near Laxminarayan cinema following a tip.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.