शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

'' त्यांनी '' निवडलेले आसन ठरले मृत्युचे.!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 7:00 AM

वेळ अन् काळही चुकला , मैत्रीची कामावरच अखेर

ठळक मुद्देविजय नवघणे व धीरज सोनाग्रा हे मागील दोन वर्षांपासून एकाच व्हॅनवर होते कार्यरत

पुणे : टिळक रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी लगतच्या रस्त्यावर व्हॅन उभी केली होती... सहकारी मॅकेनिक बंद पडलेल्या बसकडे गेलेले... मात्र गर्दीची वेळ असल्याने चालक विजय नवघणे व्हॅनमध्येच थांबले. पण ते चालकाच्या आसनावर न बसता मधल्या आसनावर बसले... अन् नेमके त्याच भागावर मोठे झाड कोसळले... त्यांना जागेवरून उठताही आले नाही... हे बस ब्रेकडाऊन त्यांचे अखेरचे ठरले. विजय नवघणे हे मागील काही वर्षांपासून 'पीएमपी' मध्ये चालक म्हणून कार्यरत होते. सध्या ते पीएमपीच्या वायरलेस विभागात होते. मार्गावर बस बंद पडल्यानंतर दुरूस्ती व्हॅन घटनास्थळी नेली जाते.मॅकेनिककडून बस दुरूस्त करून पुन्हा मार्गस्थ केली जाते. मोठा बिघाड असल्यास व्हॅनने आगारापर्यंत ओढत नेली जाते. याच व्हॅनवर नवघणे हे चालक म्हणून काम करत होते. बुधवारी (दि. ९)ही याच कामावर होते. दुपारी अडीच कामावर आल्यानंतर नेहमीचे सहकारी मेकॅनिक धीरज सोनाग्रा यांच्यासह त्यांनी कामाला सुरूवात केली. सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सोनाग्रा यांनी तीन बस दुरूस्त केल्या. सिंहगड रस्त्यावरील तिसरी बस दुरूस्त करून ते स्वारगेटच्या दिशेने निघाले होते. तेवढ्यात सारसबागेजवळ असताना त्यांना वायरलेसवरून टिळक रस्त्याला जायला सांगितले. सोनाग्रा यांनी 'लोकमत' शी बोलताना याबाबत माहिती दिली. बसजवळ पोहचल्यानंतर व्हॅनही तिथेच उभी केली होती. बसची स्थिती पाहिल्यानंतर लवकर दुरूस्त होणार नाही असे वाटले. खुप वाहतुक कोंडी असल्याने व्हॅन टिळक रस्त्याच्या लगतच्या रस्त्यावर नेली. आम्ही दोघे खाली उतरलो. नवघणे पाणी पिऊन सोबत येत होते. पण त्यांना वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून बसमध्येच बसायला सांगितले. त्यानुसार ते बसकडे गेले. तोपर्यंत पाऊसही सुरू झाला होता. मी बंद बसकडे जाऊन आडोशाला थांबलो. पण तेवढ्यात व्हॅनवर मोठे झाड पडल्याची ओरड सुरू झाली. नवघणे बसमध्येच असल्याने लगेच तिकडे गेलो. पण त्यांना वाचवू शकलो नाही. नवघणे हे त्यांच्या नेहमीच्या म्हणजे चालकाच्या आसनावर बसले नव्हते. व्हॅनमध्ये मागील बाजूला इतरांना बसण्यासाठी असलेल्या आसनावर ते बसले होते. नेमक्या त्याच भागावर झाड कोसळले. त्यांनी त्यावेळी निवडलेले आसन मृत्यूचे ठरले. ---------------विजय नवघणे व धीरज सोनाग्रा हे मागील दोन वर्षांपासून एकाच व्हॅनवर कार्यरत होते. नेहमी दोघांचीच एकत्रित नियुक्ती असायची. त्यादिवशीही व्हॅनवर ते दोघेच होते. या घटनेमुळे सोनाग्रा यांना मोठा धक्का बसला आहे. घटनेनंतर ते मित्राला वाचविण्यासाठी स्वत: बसमध्ये गेले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण पण खुप मोठे झाड होते. त्यांना बाहेर काढणे अशक्य होते. व्हॅनमधील या मैत्रीचा अंतही व्हॅनमध्येच झाला.टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालयाजवळ ठेकेदाराची बस बंद पडली होती. सहसा, पीएमपीच्या व्हॅन ठेकेदाराकडील बस दुरूस्त करण्यासाठी जात नाहीत. ठेकेदारांकडून त्यांची यंत्रणा वापरली जाते. पण बुधवारी या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने तातडीने व्हॅन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार नवघणे व सोनाग्रा हे बस दुरूस्त करण्यासाठी गेले.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेRainपाऊसDeathमृत्यू