शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यापाठोपाठ तरसाचा धुमाकूळ

By admin | Updated: January 31, 2015 22:47 IST

बिबट्याचा वावर असल्याबरोबरच काल रात्री तरसाने रामलिंग रोडवरील शिक्षक वसाहत परिसरात धुमाकूळ घातला

शिरूर : बिबट्याचा वावर असल्याबरोबरच काल रात्री तरसाने रामलिंग रोडवरील शिक्षक वसाहत परिसरात धुमाकूळ घातला. दरम्यान, कुंभारआळी परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्याच्या मागणीचे निवेदन वन विभागाला दिले आहे. दोन दिवसांपूर्वी कुंभारआळीतील नागरिकांनी बिबट्याला पाहिले होते. वनाधिकारी डी. वाय. भुर्के यांनी ठशांची तपासणी केली असता बिबट्याच्याच पायाचे ठसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दुसऱ्या दिवशीही वीटभट्टीवर विटांवर असेच ठसे आढळून आले होते. कुंभारआळीसह नदीकिनारील इतर भागातील नागरिक यामुळे अद्यापही भीतीच्या सावटाखाली आहेत. बिबट्याचा उपद्रव अचानक जाणवेल, याची शक्यता असल्याने तो पकडला जावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे. गेले तीन दिवस संपूर्ण शहरात बिबट्याचीच चर्चा आहे. आज सकाळी रामलिंग रोडवर शिक्षक वसाहतीजवळ एका वीटभट्टीजवळ बिबट्याने विटेसाठी लागणारी माती अस्ताव्यस्त केली, अशी बातमी शहरात पसरली. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तेथे पाहणी केली. मात्र, ते ठसे तरसाचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. तरस असला, तरीही रामलिंग रोड परिसरातील नागरिक बिबट्याच त्या भागात आला समजून भयभीत झाले आहेत. ४कुंभारआळी भागातील नागरिकांनी पिंजरा लावण्यासाठी लेखी निवेदन वन विभागाकडे दिले. आणखी एका संघटनेनेही अशा स्वरूपाची लेखी मागणी केली. यानुसार उद्या दुपारपर्यंत संबंधित भागात पिंजरा लावला जाईल, असे वनरक्षकाने सांगितले.