माहेरून पैसे आणण्यासाठी मंचरमधील विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST2021-07-27T04:11:46+5:302021-07-27T04:11:46+5:30

विवाहितेचा पती सचिन शिवाजी मावकर,सासु भारती शिवाजी मावकर, सासरे शिवाजी श्रीपती मावकर,ननंद ज्योती विशाल थोरात,नंदावा विशाल विठ्ठल थोरात,दीर स्वप्नील ...

Harassment of a married woman in Manchar to bring money from Maher | माहेरून पैसे आणण्यासाठी मंचरमधील विवाहितेचा छळ

माहेरून पैसे आणण्यासाठी मंचरमधील विवाहितेचा छळ

विवाहितेचा पती सचिन शिवाजी मावकर,सासु भारती शिवाजी मावकर, सासरे शिवाजी श्रीपती मावकर,ननंद ज्योती विशाल थोरात,नंदावा विशाल विठ्ठल थोरात,दीर स्वप्नील शिवाजी मावकर,जाऊ माधुरी स्वप्नील मावकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवाहिता शितल सचिन मावकर सध्या (रा.मांजरवाडी) हिचा विवाह चांडोली येथील सचिन शिवाजी मावकर यांच्याशी पाच वर्षापूर्वी झाला. लग्न झाल्यापासून आजपर्यंतसासरच्या मंडळींनी तिला वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी छळ केला. तिने काही पैसे आणले मात्र आणखी पैसे आणण्यासाठी नणंद, नंदावा, दीर व जाऊ यांनी शिवीगाळ वेळोवेळी अपमान केला आहे. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी पती सचिन शिवाजी मावकर,सासु भारती शिवाजी मावकर,सासरे शिवाजी श्रीपती मावकर, ननंद ज्योती विशाल थोरात, नंदावा विशाल विठ्ठल थोरात, दीर स्वप्नील शिवाजी मावकर,जाऊ माधुरी स्वप्नील मावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत.

Web Title: Harassment of a married woman in Manchar to bring money from Maher