शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

शासकीय तांत्रिक विद्यालयांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:43 PM

राज्यभर ठिकठिकाणी तांत्रिक विद्यालये असून अन्य शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहेत.

ठळक मुद्देशिक्षक, कर्मचारी धास्तावले : अधिकारी म्हणतात, केवळ अभ्यासक्रम अद्ययावत होणार नवीन अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा

राजानंद मोरे पुणे : राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालये बंद करून त्याठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा व्यवसाय प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसे स्पष्टपणे नमूदही करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यालयांमधील शिक्षक व कर्मचारी धास्तावले आहेत. राज्यात १९६०पासून शासकीय तांत्रिक विद्यालये सुरू झाली असून, सध्या सुमारे ५३ विद्यालये आहेत. त्यावेळी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे तांत्रिक विषय सुरू करण्यात आले. त्यानंतर १९७८ पासून कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तर १९८७ पासून किमान कौशल्यावर आधारित (एमसीव्हीसी) अभ्यासक्रम सुरू झाले. सध्या द्विलक्षी अभ्यासक्रमांचे काही विषय फक्त शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्येच सुरू आहेत. राज्यभर ठिकठिकाणी तांत्रिक विद्यालये असून अन्य शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहेत. बहुतेक विद्यालयांमध्ये ‘एमसीव्हीसी’ हा दोन वर्षांचा दहावीनंतरचा अभ्यासक्रम आहे. ही विद्यालये बंद करून त्याठिकाणी नवीन अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) विस्तार आराखडा तयार करण्याविषयी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दि. १९ मार्च रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये शासकीय तांत्रिक विद्यालयांची सद्यस्थिती, अभ्यासक्रमांवर चर्चा करण्यात आली आहे. ‘विद्यमान शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेले व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून तिथे उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयीसुविधांचा अभ्यास करून (उदा. जागा, वीज, यंत्रसामग्री) नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा व्यवसाय प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय) सुरू करणे’ असे निर्देश प्रधान सचिवांनी दिल्याचे इतिवृत्तामध्ये आहे.याबाबतचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षणच्या पाच विभागीय सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.शिक्षकांशी चर्चा नाहीतिवृत्तानुसार तांत्रिक विद्यालये बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसते. याबाबत आपल्याशी कसलीही चर्चा न करता गोपनीय पद्धतीने विद्यालयांतील अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अद्याप एकदाही विश्वासात घेतले नसल्याचे काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

.......................

तांत्रिक विद्यालये बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही. रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये तांत्रिक विद्यालयांचे काय करायचे, याचा विचार सुरू आहे. ‘एमसीव्हीसी’च्या काही शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये केवळ तीन-चार प्रवेश आहेत. त्यामुळे साधनसामग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. कोणत्याही शिक्षक, संस्थेला हात न लावता संस्थांमधील सध्याचे अभ्यासक्रम अद्ययावत करून ते रोजगारक्षम करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. तांत्रिक विद्यालयाऐवजी ‘आयटीआय’ किंवा ‘व्हीटीआय’ असे नाव दिले जाऊ शकते. - अनिल जाधव, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षकStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज