शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

घरकामांच्या वाटणीने झाली ‘दिलजमाई’

By admin | Updated: January 30, 2015 03:44 IST

उच्चभ्रू दुनियेत दोघांचाही करिअर ग्राफ उंचावत चालला होता; पण वैवाहिक जीवनामध्ये मात्र दुरावा निर्माण होत गेला. रोजची कुरकुर, भांडणाला वैतागून ‘त्या’ दोघांनी थेट न्यायालयाचेच दार ठोठावले

पुणे : उच्चभ्रू दुनियेत दोघांचाही करिअर ग्राफ उंचावत चालला होता; पण वैवाहिक जीवनामध्ये मात्र दुरावा निर्माण होत गेला. रोजची कुरकुर, भांडणाला वैतागून ‘त्या’ दोघांनी थेट न्यायालयाचेच दार ठोठावले. सारे काही चुटकीसरशी हवे असणाऱ्या जमान्यातील या दोघांनाही तत्काळ फारकत हवी होती. ‘घरकामाची वाटणी’ या किरकोळ कारणाचा साक्षात्कार त्यांना न्यायालयाच्या आवारात झाला. वकिलाच्या शोधार्थ आलेले दोघे वकिलाशिवायच एकत्र नांदायला परतले. हे घडले ते दाखलपूर्व समुपदेशनाने !!सरिता व राजेश (नावे बदललेली) दोघांचाही नुकताच विवाह झाला होता. सरिताने घटस्फोटाचे निश्चित केलेले होते व त्यासाठी वकील शोधण्यास ती न्यायालयात आली. तेथे ती चौकशीसाठी पुणे जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव महेश जाधव यांच्याकडे गेली.जाधव यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर त्यांनी तिचे समुपदेशन केले. त्यातून राजेशने घरकामात मदत करावी, इतकीच तिची अपेक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राजेशलाही बोलावून घेतले. त्याचेही वैयक्तिक म्हणणे ऐकून घेतले. भांडणाचे कारण किरकोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनाही एकत्रित बसवून त्यांच्या चुका आणि अपेक्षा एकमेकांना सांगण्यात आल्या. घडल्या प्रकारातून दोघांनाही त्यांच्या चुका उमगल्या होत्या व किरकोळ कारणाचे संवादातून उत्तर शोधता येईल, हेही त्यांच्या लक्षात आले. वकिलाचा शोध पूर्ण झाला नाही; मात्र तरीही त्यांचा संसार पुन्हा नव्याने जुळला आणि दोघेही न्यायालयात प्रवेश न करता न्यायालयाच्या आवारातूनच आनंदाचे सहजीवन जगण्यास माघारी परतले. (प्रतिनिधी)